तुमच्याही तोंडाला पाणी सोडेल ही बासुंदी; पुणे, मुंबईकरांना पडते भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Nrusinhawadi Basundi Famous.gif

दत्त दर्शनासाठी आलेले भाविक विशेषतः मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या भाविकांना या विविध सुमधुर बासुंदीची भुरळ पडलेली पाहायला मिळते. साध्या बासुंदीबरोबर सध्या सीताफळ, अंजीर, मॅंगो, गुलकंद बासुंदी मागणीनुसार बनविण्यासाठी गवळी व्यावसायिकांच्या कुटुंबांमध्ये धडपड सुरू आहे.

तुमच्याही तोंडाला पाणी सोडेल ही बासुंदी; पुणे, मुंबईकरांना पडते भुरळ


नृसिंहवाडी (कोल्हापूर) : येथे गवळी व्यावसायिकांच्या कुटुंबांमध्ये बासुंदीची वेगवेगळी "क्रेझ' सध्या वाढत आहे. येथे दत्त दर्शनासाठी आलेले भाविक विशेषतः मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या भाविकांना या विविध सुमधुर बासुंदीची भुरळ पडलेली पाहायला मिळते. साध्या बासुंदीबरोबर सध्या सीताफळ, अंजीर, मॅंगो, गुलकंद बासुंदी मागणीनुसार बनविण्यासाठी गवळी व्यावसायिकांच्या कुटुंबांमध्ये धडपड सुरू आहे.

हे पण वाचा -एसटी प्रवाशांंकडे हे असेल तर पैसेही बाळगण्याची गरज नाही

बासुंदीच्या वाढलेल्या विक्रीमुळे नृसिंहवाडीस सध्या नवा आयाम मिळतोय. जिल्हा व जिल्ह्याबाहेरही वेगळी ओळख सर्वदूर पसरली आहे. सध्या या बासुंदीचा व्यवसाय पाचव्या पिढीकडून तितक्‍याच निष्ठेने आणि गुणवत्तेच्या माध्यमातून सुरू असल्याचे दिसून येते. त्याचे कोल्हापूर, पुणे, सांगलीबरोबरच कर्नाटकमध्ये मार्केटिंग सुरू आहे. बदलत्या काळानुसार साध्या बासुंदीबरोबर अंजीर बासुंदीची निर्मिती केली जाते. उन्हाळ्यात ग्राहकांच्या विशेष मागणीसाठी मॅंगो बासुंदी बनवली जाते. आंब्याच्या फोडी व आवश्‍यक ते पल्प घालून त्याची निर्मिती करण्यात येते. विशेषतः लग्नसराईत या बासुंदीला विशेष मागणी असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गुलकंद बासुंदीची मागणीप्रमाणे निर्मिती केली जात आहे. साधारणपणे साडेतीन किलो बासुंदीत एक किलो फळांचा गर घातला जातो. सध्या सीताफळ (रबडी) या बासुंदीची अधिक "क्रेझ' आहे.

हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  

दर्जेदार बासुंदी
नृसिंहवाडीत गवळी व्यावसायिकांची पाचवी पिढी दर्जेदार बासुंदी बनवत आहे. मजुरांचा तुटवडा आणि वेळेच्या नियोजनाप्रमाणे बासुंदी निर्मिती करणारे, वजन करणारे, पॅकिंग करणारे मशिन खरेदी केले असून, कमी वेळात अधिक बासुंदी तयार होते.
- अश्‍विनीकुमार गवळी व गजानन गवळी, नृसिंहवाडी

Web Title: Kolhapur Nrusinhawadi Basundi Famous

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur