कोल्हापूर - पन्हाळ्यातील नव्या तटबंदी लगतचा भाग पुन्हा घसरला; रहिवासी भीतीच्या छायेखाली

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अती पावसामुळे पन्हाळगडाची ठिसूळ झालेली तटबंदी पुन्हा ढासळू लागल्याने चार दरवाजाखालील मंगळवार पेठेतील रहिवासी पुन्हा एकदा भीतीच्या छायेखाली आले आहेत.
Landslide
Landslidesakal
Summary

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अती पावसामुळे पन्हाळगडाची ठिसूळ झालेली तटबंदी पुन्हा ढासळू लागल्याने चार दरवाजाखालील मंगळवार पेठेतील रहिवासी पुन्हा एकदा भीतीच्या छायेखाली आले आहेत.

पन्हाळा - गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अती पावसामुळे पन्हाळगडाची ठिसूळ झालेली तटबंदी पुन्हा ढासळू लागल्याने चार दरवाजाखालील मंगळवार पेठेतील रहिवासी पुन्हा एकदा भीतीच्या छायेखाली आले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने नुकत्याच बांधलेल्या तटबंदी लगतचा निसटू पहाणारा भाग आज सकाळी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घसरला. एका बाजूला वाहणारे पाणी आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या प्रवाहामुळे घसरत जाणारी माती, दगड यांचे चित्रीकरण मंगळवार पेठेतील काही लोकांनी केले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली.

गतवर्षी जुलै महिन्यात चार दरवाजा परिसरातील तटबंदी जोरदार पावसामुळे कोसळली. आणि पन्हाळगडी येणारा मुख्य रस्ता बंद झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याने जिओ ग्रेड पध्दतीने लोखंडी जाळीसह पायऱ्या पायऱ्यांचे पिचिंग सारखे दगडी बांधकाम करून साधोबा तलावातील तसेच नागझरी परिसरातून पावसाळ्यात वाहणारे पाणी आणि नगरपरिषदेचे ड्रेनेजचे पाणी वाहून जाण्यासाठी सोय करून गेल्याच महिन्यात रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तोपर्यंत आज चार दरवाजाखालील भरावाचा बराच भाग पाण्यामुळे घसरला. अर्थात नवीन बांधकाम केलेल्या भागास कोणताही धोका पोहोचला नसला तरी, चार दरवाजातील पडलेल्या पहिल्या दरवाजाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. दरवाजाच्या आतील भाग अगोदरच भेगलेला असल्याने आणि त्याच्या खालचा भाग आज घसरल्याने जुन्या नाका इमारतीसह बुरुजाला धोका निर्माण झाला आहे.

हा परिसर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत आहे.पडू पाहणाऱ्या बुरुजाची आणि तटबंदीची पाहणी तसेच खर्चाचे अंदाजपत्रक या खात्याच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठवले आहे.पुरातत्व खात्याने चार दरवाजा खालील दगडी शिळांवरील तटबंदीचा कोसळलेला आणि कोसळू पहाणारा भाग दुरुस्त करून घेतला तरच या दरवाजाची ओळख टिकणार आहे.

जीर्ण झालेला चार दरवाजा खालील काही भाग आज पावसाने कोसळला असला तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने नव्याने तयार केलेल्या बांधकामास कोणताही धोका नाही.

- धनंजय भोसले, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, शाहुवाडी विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com