

Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
sakal
कंदलगाव : घरातील पाळीव मांजराच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जेवणाच्या ताटावरून उठून तो मांजराकडे धावला. धावताना पाणी खेचणाऱ्या मोटारीच्या वायरचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला. शाहू संदीप पाटील (वय १३, रा. कंदलगाव) असे त्या शाळकरी मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.