Gold Silver Loot
esakal
कोल्हापूर
Gold Silver Loot : ज्वेलरी फोडून १९ किलो चांदी ७०० ग्रॅम सोनं चोरलं, आराम बस बूक करून पुण्याला निघाला पण...; किणी टोल नाक्यावर थरार
Kolhapur Kini Toll Naka : किणी (ता. हातकणंगले) टोल नाक्यावर कर्नाटकातून आलेली आराम बस थांबवत पोलिसांनी कारवाई केली. लुटीचा माल ठेवलेल्या दोन मोठ्या बॅगाही चोरट्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
Silver & Gold Looted Thief Caught : कर्नाटकातील गदगमध्ये सराफाचे दुकान फोडून दागिने व रोकड असा ८० लाखांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यास कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने पेठवडगाव पोलिसांनी सापळा रचून पकडले. येथील किणी (ता. हातकणंगले) टोल नाक्यावर कर्नाटकातून आलेली आराम बस थांबवत पोलिसांनी कारवाई केली. लुटीचा माल ठेवलेल्या दोन मोठ्या बॅगाही चोरट्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. महंमद हुसेन (रा. नागपूरवाला चाळ, अहमदाबाद) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेचारच्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.

