

१२ ग्रॅम एमडी ड्रग्जसाठी लाखो रुपयांची डील; पुणे-बंगळुरू हायवेवर पोलिसांची सिने स्टाईल कारवाई
esakal
MD Drugs Deal Crime News : स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आज येथे एम. डी. ड्रग्ज विक्रीप्रकरणी अभिषेक कुशाजी मोरे (वय २३, रा. जाधववाडी, घोडके गल्ली, कोल्हापूर) आणि विवेक तानाजी पोवार (२८, रा. संकपाळ कॉम्प्लेक्स, सी-१. उचगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. महामार्गावर उचगाव येथे कारवाई करण्यात आली.