कोविड तपासणीत हलगर्जीपणा; 20 लॅबना दणका

कोविड तपासणीत हलगर्जीपणा; 20 लॅबना दणका
Updated on

कोल्हापूर : शासनाच्या कोविड पोर्टलवर 25 एप्रिल ते 12 मे 2021 या कालावधीत आरटीपीसीआर(1877 )(RTPCR,Rapid antigen test)आणि रॅपीड अॅन्टीजेन टेस्टचे (322) अहवाल 20 लॅबनी (20 Labs) वेळेत सादर केले नाहीत. या 20 लॅबनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण (ZP Chief Executive Officer SanjaySingh Chavan)यांनी त्यांना नोटीसा बजाविल्या आहेत.(20-labs-Notice-for-negligence-in-Covid-investigation-covid-19-kolhapur-news)

रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट अंतर्गत अनुष्का डायग्नोस्टिक सेंटर (शिरोळ) ,केअर मल्टिस्पेशालिटी (हातकणंगले), निदान पॅथालॉजी (इचलकरंजी) ,जयसिंगपूरच्या अनुक्रमे पायोस हॉस्पिटल , श्री साई लॅब, कोल्हापूरचे शिवतेज लॅब , पार्थ लॅब , देसाई पॅथालॉजी, सृष्टी क्लिनिकल लॅबोरेटरी , मृण्मयी लॅब, हेल्थ व्हयू या 11 लॅबनी आपले अहवाल वेळेत सादर केले नाहीत. तर आरटीपीसीआर अंतर्गंत कृष्णा डायग्नोस्टिक (पुणे) , डॉ . लाल पॅथालॉजी (विमान नगर - पुणे) , मेट्रो पोलीस हेल्थ केअर (मुंबई) , प्रिव्हेंन्टीन लाईफ केअर (नवी मुंबई) , थायरो केअर टेक्नॉलॉजी प्रा .लि. (नवी मुंबई) , इन्फेक्शन लॅबोरेटरीज (ठाणे) ,युडीसी सॅटेलाईट लॅबोरेटरी (नवी मुंबई), सब अर्बन डायग्नोस्टिक पुणे आणि सदाशिव पेठ (पुणे) येथील अपोलो हेल्थ लाईफ स्टाईल या 9 लॅबनी त्यांच्याकडील कोविड रूग्णांच्या चाचण्यांचा अहवाल (IDSP) एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षास वेळेत आणि विहीत नमुन्यात सादर केला नाही. यामुळे जिल्ह्याच्या कोविड निर्देशांकामध्ये तफावत दिसत असल्याने या नोटीसा देण्यात आल्या आहेत .

आपत्ती कायदयातंर्गत व साथरोग कायदयान्वये या दोषी लॅबवर पुढील कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतचा अहवालही सादर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis latest statement on ethanol petrol
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Devendra Fadnavis Satej Patil
Marathi News Esakal
www.esakal.com