
संदीप खांडेकर
कोल्हापूर : यंदापासून शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर निवड होणाऱ्या खेळाडूंच्या खिशाला वय पडताळणी चाचणीसाठी (एज व्हेरिफिकेशन टेस्ट) कात्री लागणार आहे. चाचणीसाठी २ हजार २६६ रुपये शुल्क आकारले जाणार असल्याने खेळाडूंनाच त्याची तरतूद करावी लागणार आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हा क्रीडा कार्यालयाला पाठविण्यात आले असून, वयाची बनावटगिरी करणाऱ्यांना यामुळे चाप बसणार आहे.