
Kolhapur
esakal
Kolhapur End Life News : गडहिंग्लज येथील चर्च रोड परिसरातील एका तरुणाने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला. विनय कृष्णात देसाई (वय २७) असे त्याचे नाव आहे. विनय नोकरी नसल्याने काही दिवसांपासून अस्वस्थपणे वावरत होता. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज गडहिंग्लज पोलिसांनी वर्तविला आहे.