
Ambabai Temple
esakal
स्वच्छता मोहीम सुरू
महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पालखी मार्ग, नवदुर्गा मंदिर व अंबाबाई मंदिर परिसरात ‘स्वच्छता मोहीम’ सुरू केली आहे.
दोन शिफ्टमध्ये कर्मचारी
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली २८ कर्मचारी (१४ सकाळी ६ ते दुपारी २, १४ दुपारी २ पासून मंदिर बंद होईपर्यंत) नियुक्त; ४ टिप्पर, १ ट्रॅक्टर व डंपरची व्यवस्था.
स्वच्छता हीच सेवा २०२५
अनिरुद्ध ॲकॅडमीच्या सहकार्याने दहा दिवस सकाळी ६ वाजल्यापासून मंदिर परिसरात सफाई; सहा टॉयलेट युनिट्स बसवून दिवसातून दोनवेळा स्वच्छता.
Kolhapur Municipal Workers : महानगरपालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पालखी मार्ग, नवदुर्गा मंदिर परिसर तसेच अंबाबाई मंदिर परिसरात ‘स्वच्छता मोहीम’ सुरू केली आहे. उत्सव कालावधीत होणारी गर्दी विचारात घेता दोन शिफ्टमध्ये २८ कर्मचारी नियुक्त केले असून, सकाळी सहापासून रात्री मंदिर बंद होईपर्यंत ते कार्यरत राहणार आहेत.