उत्तूर : बहिरेवाडीजवळ दोन पिस्तूलसह २९ राऊंड जप्त.

आजरा पोलीसांची कारवाई, सोलापूरच्या दोन युवकाना ताब्यात
दोन पिस्तूलसह २९ राऊंड जप्त.
दोन पिस्तूलसह २९ राऊंड जप्त.sakal

उत्तूर : बहिरेवाडी ता.आजरा येथील चोथ्याची खोप परिसरातून दोन पिस्तूल,२९राऊंड,रोख रक्कम व झायलो कार पोलीसानी जप्त केली. उपविभागीय पोलीस आधिकारी कार्यालयाचे पोलीस व आजरा पोलीसानी ही कारवाई केली याप्रकरणी सद्दाम रशीद शेख( वय २७) व शहानवाज अल्लादीन शेख ( वय १९. दोघे रा.विरवाडे बुद्रुक,ता.मोहळ,जि. सोलापूर ) या दोन युवकाना पोलीसानी ताब्यात घेतले.

याबाबात हकिकत अशी पोलीस या परिसरात गस्त घालीत होते.यावेळी निपाणीहून आज-याकडे पांढ-या रंगाची झायलो गाडी (क्रमांक एमा.एच १४जि.डी.४३०६) भरधाव वेगाने जात असल्याचे आढळले. पोलीसनी हात करुनही ती थांबली नाही. पोलीसानी दुस-या पथकाला माहीती दिली,त्यानी रस्त्यात पोलीस गाडी आडवी लावून ही कार थांबवली यावेळी गाडीची झडती घेतली असता गाडीत लपवलेली दोन गावठी बनावटीची पिस्तुल आढळली. खिशात लपवलेली २९राऊंड आढळली पोलीसानी गाडीसह ९लाख,६० हजार,३५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अधीक तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com