‘वारणा’कडून गाय दूध खरेदी दरात २ रुपये वाढ

अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे; गणेशोत्सवाची भेट
2rs increase in price of buying cow milk from Varana MLA Vinay Kore kolhapur
2rs increase in price of buying cow milk from Varana MLA Vinay Kore kolhapursakal

वारणानगर : पशुखाद्य, चाऱ्याची टंचाई व वाढलेले दर या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दूधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ देण्याची घोषणा अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादकांतून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अध्यक्ष डॉ. कोरे म्हणाले, ‘‘दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने १ सप्टेंबरपासून गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये प्रमाणे वाढविण्यचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

आता ३.५ फॅटला व ८.५ एस.एन.एफला तो ३२ रुपये झाला आहे. वारणा दूध संघाची दही, लस्सी, ताक, दूध या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून वारणा श्रीखंडाची या वर्षी विक्रमी विक्री केली आहे.’’ दूध संघाने महापूर, अवकाळी पाऊस अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. अल्पदरात पशुवैद्यकीय सेवा, विमा सुरक्षाकवच व रेडी संगोपन यांसारखे अनेक उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग इनचार्ज अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.

गायीच्या दूध दरात सर्वोच्च

जिल्ह्यात गायीचा दूध दर आता ३.५ फॅटला ३० वरुन ३२ वर झाला. त्यामुळे दूध उत्पादकांना नेहमी सवलती आणि सुविधा देणारा ‘वारणा’ दूध दरातही परंपरेप्रमाणे सर्वोच्च ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com