महाकुंभमेळा हा दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. तीन पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत संयोग जुळून येतो.
कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj Uttar Pradesh) येथे मकर संक्रांतीपासून ते महाशिवरात्रीपर्यंत (Mahashivratri) महाकुंभमेळा (Mahakumbh Mela) होणार आहे. या मेळ्यासाठी जगभरातून भाविक दाखल होणार आहेत. या भाविकांना येथे कुंभमेळ्यादरम्यान दररोज जेवणावळीसाठीचे आखाडे होणार आहेत. या जेवणावळींसाठी आतापर्यंत प्लास्टिक, थर्माकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. ज्या वापरल्यानंतर फेकून दिल्या जातात.