
Automatic Weather Stations
esakal
स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी प्रकल्प – केंद्र शासनाच्या हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टीमअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १०३२ ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र उभारणी सुरू असून, आतापर्यंत ७५ ग्रामपंचायतींमध्ये केंद्र उभारले गेले आहेत.
४२३ ग्रामपंचायतींत जागा निवड बाकी – शासकीय/अर्धशासकीय जागा उपलब्ध करणे आवश्यक असून, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरपंचांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
तांत्रिक निकष व समिती – तहसीलदार अध्यक्ष असलेल्या तालुकास्तरीय समितीद्वारे योग्य तांत्रिक निकषांनुसार जागा निवडली जाईल; आठवड्यात १००% निवड पूर्ण करून अभिलेख जिल्हास्तरावर सादर करायचे आहेत.
Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टम व स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीसाठी प्रकल्प हाती घेतला असून, जिल्ह्यात ७५ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी हे प्रकल्प उभारले आहेत. उर्वरित जागा न निवडलेल्या ४२३ ग्रामपंचायतींची संख्या आहे.
हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टम प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी; असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व ग्रामपंचायतीना केले आहे.