
-ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : जिल्ह्यात गळीत हंगामासाठी ऊस तोडणी सुरू आहे. उसाचा पाला सर्रास जाळला जातो. या पाल्याचे प्रमाण लक्षात घेतले, तर हेक्टरी १० टन पाला पडतो. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र सुमारे १ लाख ८६ हजार हेक्टर इतके आहे. यातील ऊस तोडल्यानंतर सर्वसाधारणपणे १८ लाख ६० हजार टन पाचट शिल्लक राहते.