

९ वर्षांचा चिमुकला वाट हरवून कोल्हापुरात आला अन् पोलिसांनी एका शब्दावर आई आणि मुलग्याची भेट करून दिली...
esakal
Kolhapur Police News : हातात स्मार्ट वॉच, खिशात चार्जर, काही पैसे घेऊन तो घराबाहेर पडतो. मी मूळचा चनेगावचा आहे, दोन दिवसांपासून काय मिळेल ते खातोय, लोकांकडे ‘लिफ्ट’ मागून मी शहरात पोहोचलो. मला चनेगावला जायचे आहे. कधी मराठी, तर कधी कन्नडमधून बोलणाऱ्या बोबड्या बोलामुळे पोलिसही अचंबित झाले. त्याचे घर, पालक कसे शोधायचे हा प्रश्न. ‘हातकणंगले’ हा एकच ओळखीतील शब्द कानावर पडताच पोलिसांनी यंत्रणा गतिमान केली. अवघ्या चार तासांत घरातून बाहेर पडलेल्या मुलाच्या आईचा शोध घेण्यात यश आले.