
Kolhapur Friend Killed
esakal
घटनाक्रम...
दोघेही घरात चहा पित चर्चा करीत होते
चर्चेतून वाद, वादातून शिवीगाळ आणि हल्ला
हल्लेखोर बाहेर पडताना वीज वायर ओढली गेली
शॉर्टसर्किटमुळे घरातील एका खोलीला आग
धूर दिसताच लोकांची धाव; खुनाचा प्रकार उघड
Elderly Man Kills Friend : शिवी दिल्याने जिवलग मित्रानेच हनुमाननगरातील रिक्षाचालक मोहन सूर्यकांत पोवार (वय ७३) यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. दोघांची सुमारे ६० वर्षे मैत्री होती.
हल्लेखोर पळून जाताना वायर ओढली गेल्याने शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील एक खोली पेटली. सकाळी अकराच्या सुमारास पोवार यांच्या घरातून धूर बाहेर आल्याचे पाहून स्थानिक जमा झाले. त्यांनी घरात जाऊन आग आटाेक्यात आणल्यानंतर बेडरूममध्ये पोवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा जिवलग मित्र चंद्रकांत केदारी शेळके (७३, रा. मोहिते मळा, देवकर पाणंद) याला अवघ्या चार तासांत अटक केली.