

Kolhapur girl wins Revolver of Honor award
esakal
Revolver of Honor Kolhapur Girl : ‘माझी लेक एक दिवस पोलिस उपनिरीक्षक होईल...’ सैन्यात कार्यरत असलेले शांताराम पाटील हे स्वप्न मनाशी बाळगून होते; मात्र कोरोना काळात नियतीने पितृछत्र हिरावले. तरीही त्या स्वप्नावर माती पडू दिली नाही, ती लेक म्हणजे प्रियांका पाटील. साडेचारशे लोकवस्तीच्या जकनहट्टी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या छोट्याशा गावातून आलेल्या प्रियांकाने केवळ पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले नाही, तर महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षणात झोकून देत पाच पारितोषिकांसह ‘उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’ होण्याचा बहुमान मिळविला. त्यातील सर्वांत मानाचा सन्मान ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ हे जणू दिवंगत वडिलांना दिलेले मौन अभिवादनच ठरले.