

Two vegetable vendors killed in Kolhapur accident
esakal
Road Accident Kolhapur : संकेश्वर-बांदा महामार्गावर येथील सुलगाव फाट्याजवळील अपघातात दोन भाजी व्यावसायिक ठार झाले. कृष्णा कलाप्पा कांबळे, मनीष श्रीकांत सोलापुरे (दोघेही रा. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. कृष्णा यांची पत्नी गीता (रा. गडहिंग्लज) जखमी झाल्या आहेत. व्हॅन व ट्रक यांच्यात मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास धडक झाली.