esakal | दुबईत पार पडलेल्या पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियन शिपमध्ये कोल्हापूरच्या आरती पाटीलला कास्य पदक
sakal

बोलून बातमी शोधा

Aarti Patil wins bronze at International Badminton Championships sport marathi news

 पुढच्या महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आरतीची निवड झाली आहे.आरती उचगाव येथे राहते.

दुबईत पार पडलेल्या पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियन शिपमध्ये कोल्हापूरच्या आरती पाटीलला कास्य पदक

sakal_logo
By
मतिन शेख

कोल्हापूर : कोल्हापुरची दिव्यांग खेळाडू आरती पाटीलने दुबईत पार पडलेल्या पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियन शिपमध्ये कास्य पदकाला गवसनी घातली.दुहेरी महिला बॅडमिंटन प्रकारात तिने ही कामगिरी केली. तिला मानसी जोशी मुंबई हिची साथ मिळाली. पुढच्या महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या ऑलम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आरतीची निवड झाली आहे.

 पुढच्या महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आरतीची निवड झाली आहे.आरती उचगाव येथे राहते.जन्मापासूनच ती डाव्या हाताने दिव्यांग आहे. तरी ही हार न मानता तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापुरचे नाव केले आहे. तिला सोलापूरचे प्रशिक्षक सुनिल देवांग,फिजिझो डॉ. संदीप भागवत,श्रीकांत वाड,सय्यद मोदी अकॅडमी ठाणे यांचे मार्गदर्शन मिळाले. शिवाय हिंदुस्थान पेट्रोलियमने तिला सहकार्य केलं.

हेही वाचा- राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या कोगनोळीजवळ दुचाकी अपघातात वाळकीचा युवक जागीच ठार

हेही वाचा- रिक्षात बसताच क्षणी २२ रुपयांचे मीटर;  १ मेपासून होणार भाडेवाढ

loading image
go to top