arun dongle
sakal
कोल्हापूर - ‘गोकुळ’ निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एकीकडे महायुती म्हणून सर्व नेते हातात हात घालून संघाची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना, त्यांना डावलून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील हेच संघाचे ‘बाप’ असल्याचे सांगून डोंगळे यांच्याकडून खऱ्या उत्पादकांना कमी लेखण्याचा प्रकार झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.