

ABVP Protest Turns Violent at Shivaji University Video Viral
esakal
Student Police Clash Kolhapur : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी पोलिस प्रशासन आणि विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनादरम्यान पोलिस व विद्यार्थ्यांमध्ये जोरदार झटापट झाली असून काही काळ विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावर या प्रकरणाची रीतसर चौकशी करून कार्यवाही करण्याची ग्वाही प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.