Accident: महापालिकेच्या उपायुक्तांना दिली ट्रॅक्टर - ट्रॅालीने धडक, वाचा इचलकरंजील धक्कादायक प्रकार

Latest Kolhapur News : शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यातून बाजूला करण्यात आली. सुमारे तासाभरानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातात उपायुक्तांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
Accident: महापालिकेच्या उपायुक्तांना दिली ट्रॅक्टर - ट्रॅालीने धडक, वाचा इचलकरंजील धक्कादायक प्रकार
Updated on

इचलकरंजी, ता. ७ ः इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या मोटारीला ट्रॅक्टर - ट्रॅालीने धडक दिली. यामध्ये ते थोडक्यात बचावले. त्यांना कोणतीही शारिरीक इजा झाली नाही. मात्र त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला.

स्टेशन रोडवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आज दुपारी तीन वाजता हा अपघात झाला. यामध्ये उपायुक्त काटकर यांच्या मोटारीच्या चालकाकडील बाजूचे मोठे नुकसान झाले असून अपघातस्थळी काचांचा खच पडला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com