कोल्हापूर : प्रॉक्टरिंगद्वारे २८ विद्यार्थ्यांवर कारवाई

विविध परीक्षांना प्रारंभ; प्रॉक्टरिंगद्वारे परीक्षार्थींवर वॉच
shivaji university kolhapur Action against 28 students proctoring kolhapur
shivaji university kolhapur Action against 28 students proctoring kolhapursakal

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करून गैरप्रकार करणाऱ्या २८ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. गैरप्रकार शोधण्यासाठी यंदा प्रॉक्टरिंग पद्धत सुरू केली आहे. यासाठी विशेष पथकांची नेमणूकही केली असून ते आता ऑनलाईन परीक्षा देणाऱ्यांवर नजर ठेवणार आहेत. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार करू नये अन्यथा कारवाई सामारे जावे लागेल, असे आवाहन परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.

विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ६६४ अभ्यासक्रमांपैकी ३६२ अभ्यासक्रमांची परीक्षा आज सुरू झाली. यासाठी १९ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १९ हजार १ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नोंदणी केलेल्यांपैकी ९८.२१ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षातही ऑनलाईन अध्यापन करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षाही ऑनलाईन घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे निश्चित केले. आज झालेल्या परीक्षेमध्ये २८ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला. हेडफोन वापरून गैरप्रकार करणे, मोबाईलद्वारे संपर्क साधून उत्तरे लिहिणे, एकाच प्रेममध्ये दोन विद्यार्थी दिसणे अशा प्रकारचे गैरप्रकार परीक्षेदरम्यान सुरू असल्याचे विशेष पथकाच्या लक्षात आले. त्यांनी त्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली. परीक्षा प्रमाद समितीच्या नियमानुसार या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. आज ९८ विषयांच्या परीक्षा झाल्या.

महाविद्यालये सुरू झाली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून महाविद्यालयांमध्ये ऑनलाईऩ अध्यापन सुरू होते. मात्र आज पासून जिल्ह्यातील २७४ महाविद्यालयांमध्ये प्तत्यक्ष अध्यापन सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून महाविद्यालयात प्रवेश दिला. मास्क आणि सॅनेटायझरची व्यवस्थाही करण्यात आली होती. काही महाविद्यालयांमध्ये परीक्षेचे कामकाज सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com