

इचलकरंजीतील ‘एसएन गॅंग’च्या सहा जणांवर मोकाखाली कारवाई
esakal
Ichalkaranji Crime News : इचलकरंजी शहरात दगडफेक, तोडफोड आणि जीवघेणे हल्ले करत दहशत माजवणाऱ्या ‘एसएन गँग’ या कुख्यात संघटित गुन्हेगारी टोळीतील सहा जणांवर आज मोकांतर्गत कारवाई करण्यात आली. वजीर गँगमधून बाहेर पडत टोळीप्रमुख सलमान नदाफ याचे साथीदारांसह ‘एसएन गँग’च्या नावाखाली गुन्हेगारी कारनामे वाढले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कारवाईस मंजुरी दिली.