esakal | अत्यावश्यक वगळता कोल्हापूरातील दुकाने दुपारी तीननंतर झाली बंद; चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय

बोलून बातमी शोधा

after 3 pm shops closed down in kolhapur decision of chambers of commerce

पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या पालकमंत्री व इतर मंत्री, प्रशासन यांच्यात बैठक होणार आहे.

अत्यावश्यक वगळता कोल्हापूरातील दुकाने दुपारी तीननंतर झाली बंद; चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने प्रशासनाच्या कडक निर्बंधांना आव्हान देणारी भूमिका घेतल्यामुळे आज सर्व दुकाने सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे सकाळी प्रशासन आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये प्रशासनाच्या विनंतीनुसार आज (6) दुपारी तीननंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुपारनंतर दुकाने बंद करण्यात आली. पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या (7) पालकमंत्री व इतर मंत्री, प्रशासन यांच्यात बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील दिशा निश्‍चित होईल, असे चेंबर ऑफ कामर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

हेही वाचा - सलग दुसऱ्या वर्षी जोतिबा चैत्र यात्रा रद्द; व्यापारी, दुकानदारांना आर्थिक फटका

प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेवून आज दुकाने सुरू ठेवल्यामुळे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनाचे पदाधिकारी यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना बोलावून घेवून सर्व व्यापारी आस्थापने (अत्यावश्‍यक व जिवनावश्‍यक सेवा सोडून) बंद ठेवावीत, असा शासनाचा निर्णय झाल्याचे सांगितले. तरीही चेंबरमार्फत सर्व व्यापारी आस्थापने सुरू करण्यात आली आहेत, ती बंद करण्याचे आवाहन केले. यानंतर अधिक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार दुपारी तीननंतर सर्व दुकाने बंद करण्यास सुरवात झाली. तसेच व्यापाऱ्यांनी दुपारी तीननंतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन ही अध्यक्ष शेटे यांनी केले.