

शस्त्र तस्करी प्रकरणात महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक झाल्यानंतर घरच्यांनी मौन तोडले आहे.
esakal
Maharashtra Kesari wrestler Sikandar Shaikh Crime : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेकायदा पिस्तूल आणि काडतूस प्रकरणी अटक केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. याप्रकरणी इतर तीन जणांनाही अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस हरमनदीप सिंग हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील दानवीर आणि बंटी हे दोघे जण कृष्णन उर्फ हॅप्पी गुज्जर या गुंडाला आणि सिकंदर शेख यांना बेकायदा शस्त्रे नेऊन देण्यासाठी जात असल्याची माहिती गुप्तचरांकडून २४ ऑक्टोबरला समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बंटी, दानवीर आणि सिकंदर यांना अटक केली.