
Shivsena Thackeray Group : शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांच्या निवडीनंतर पक्षातील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. संजय पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत काल, सोमवारी पत्रकार परिषदेत उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या नाराजीची दखल ‘मातोश्री’वरून घेण्यात आली आहे. त्यांना उद्या, बुधवारी दुपारी एक वाजता चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे.