

Tiger Kolhapur Video
esakal
Tiger In Kolhapur : (अमर पाटील) कोल्हापूर जिल्ह्यात बिबट्याच्या वास्तव्याच्या अनेक घटना ताज्या असताना अचानक शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी जंगलात वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाघ रस्त्याने चालत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याबाबत खात्री केली असता हा व्हिडिओ खरा असून शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी जंगलातील असल्याची खात्री झाली आहे.