मंत्र्यांच्‍या आदेशानंतरही कोल्हापुरात 'डेथ ऑडिट' कडे दुर्लक्ष

मंत्र्यांच्‍या आदेशानंतरही कोल्हापुरात 'डेथ ऑडिट' कडे दुर्लक्ष

जबाबदारी तालुक्‍यावर; २९०० मृत्‍यूचा अहवाल अपूर्णच

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील कोरोना मृत्‍यूचा (covid-19 death) दर राज्‍यात आणि देशात सर्वाधिक आहे. मृत्‍यूदर अचानक वाढलेला नाही. वर्षभर सतत तो वाढतच आहे. अशाप्रकारे संसर्गाने मृत्‍यू वाढू लागल्‍यानंतर त्या‍चे ‘डेथ ऑडिट’ (death audit) केले जाते. यापूर्वीही जिल्‍ह्यात काविळीच्‍या साथीने व स्‍वाईन फ्लूने (swine flue) मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्‍यू होऊ लागल्‍यानंतर त्‍याचे ‘डेथ ऑडिट’ करण्‍यात आले. कोरोनामुळे मृत्यूचेही डेथ ऑडिट आवश्‍‍यक आहे; मात्र जिल्‍ह्यात (kolhapur district) आजअखेर कोरोनामुळे २९०० लोकांचा मृत्‍यू झाला तरी केवळ ९७ मृत्‍यूंचेच ‘डेथ ऑडिट’ उपलब्‍ध आहे. उर्वरित ऑडिट झाल्‍याचे केवळ तोंडी सांगितले जात आहे. कागदोपत्री मात्र कोणीही बोलायला तयार नाही. मंत्र्यांनी आदेश देऊनही डेथ ऑडिट होत नसेल तर आरोग्‍य

यंत्रणा व प्रशासन याबाबत खरंच गंभीर आहे का, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे. जिल्‍ह्यातील कोरोनाचा वाढता मृत्‍यूदर (kolhapur death rate) राज्‍यात चर्चेचा ठरला आहे. कोरोना मृत्‍यूदर कमी करण्‍यासाठी विविध उपाय करणे आवश्‍‍यक होते. यामध्‍ये कोरोनामुळे होणाऱ्‍या मृत्यूची कारणेही शोधणे आवश्‍‍यक होते. झालेल्‍या मृत्यूच्या कारणांमध्ये संबंधित रुग्‍ण वेळेत हॉस्पिटलमध्‍ये दाखल झाला का, औषधोपचार व्‍यवस्‍थित झाले का, कोरोनासोबत इतर आजार होते का, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन (remdesivir) दिले का, ऑक्सि‍जनपुरवठा व्‍यवस्‍थित होता का, अशी माहिती डेथ ऑडिटच्‍या माध्‍यमातून संकलित करणे आवश्‍‍यक होते; मात्र सध्‍यातरी असे ऑडिट झाल्‍याची कोणतीही माहिती कोणत्‍याच विभागाकडे नाही.

मंत्र्यांच्‍या आदेशानंतरही कोल्हापुरात 'डेथ ऑडिट' कडे दुर्लक्ष
सहआरोपी होणार का? मुश्रीफांनी दिलेल्या आव्हानावर अमल महाडिक यांची प्रतिक्रिया

डेथ ऑडिटची जबाबदारी सुरवातीस जिल्‍हाधिकारी (kolhapur collector) व त्‍यानंतर जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्‍यात आली. तत्‍कालीन मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी २५ जुलैपर्यंत ९७ कोरोना मृतांचे ‘डेथ ऑडिट’ करून घेतले. यानंतर रुग्‍णसंख्‍या वाढू लागल्‍यानंतर डेथ ऑडिट विषय मागे पडला. कोरोनाची रुग्‍णसंख्‍या कमी झाल्‍यानंतर याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. दरम्‍यान, शासनाने संबंधित तालुक्‍याच्‍या अधिकाऱ्यांवर डेथ ऑडिटची जबाबदारी सोपवली व जिल्‍हा प्रशासनाने यातून अंग काढून घेतले. तालुक्‍यातील अधिकाऱ्यांवर जबाबदारी असली तरी त्‍यापध्‍दतीने काम होत आहे की नाही, ऑडिट झाले असेल त्‍याचा अहवाल घेऊन त्‍याचे विश्‍‍लेषण करणे व या सर्वाचे इतिवृत्त करणे आवश्‍‍यक होते, मात्र यातील अनेक गोष्‍टी झाल्‍या नसल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

"कोरोनाने मृत्‍यूचे डेथ ऑडिट होणे आवश्‍‍यक आहे. यापूर्वी जिल्‍हा परिषदेकडून ९७ मृत्‍यूचे ऑडिट करण्‍यात आले आहे; मात्र आता डेथ ऑडिट करण्‍यासाठी तालुक्‍याला समिती स्‍थापन केली आहे. त्‍यांना ऑडिट कसे करावे, याबाबतची माहिती कळवली आहे. ही माहिती आल्‍यानंतर विश्‍लेषण होईल."

- डॉ. योगेश साळे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी

मंत्र्यांच्‍या आदेशानंतरही कोल्हापुरात 'डेथ ऑडिट' कडे दुर्लक्ष
अंबाबाई मंदिरातील अक्षय तृतीया सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण; बघा अंबाबाई लाईव्ह ॲपवरून

"सीपीआर व ग्रामीण रुग्‍णालय, तसेच आयजीएममधील कोरोना मृत्‍यूचे डेथ ऑडिट झाले आहे; मात्र त्‍याचा एकत्रित अहवाल नाही. त्‍याचे संकलन करुन विश्‍‍लेषण करण्‍याचे नियोजन केले आहे."

- डॉ. ए. डी. माळी, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com