Road Issue : मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन; स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने तणाव

एकसंबा-चिक्कोडी मुख्य मार्गावरील स्मशानभूमीला जाणारा रस्ता नागरिक व महिलांनी बंद करून आंदोलन केले.
Agitation
AgitationSakal
Summary

एकसंबा-चिक्कोडी मुख्य मार्गावरील स्मशानभूमीला जाणारा रस्ता नागरिक व महिलांनी बंद करून आंदोलन केले.

चिक्कोडी - नणदीवाडी (ता. चिक्कोडी) येथे सोमवारी (ता. 21) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एकसंबा-चिक्कोडी मुख्य मार्गावरील स्मशानभूमीला जाणारया रस्त्यावरून एकसंबे कुटुंबीयांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. यावेळी वादावादी होऊन दीड तासाहून अधिक काळ मुख्य रस्त्यावर मृतदेह घेऊन नागरिक व महिलांनी रस्ता बंद करून आंदोलन केले. यावेळी तणाव झाल्याची माहिती मिळताच चिक्कोडीचे तहसीलदार व सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नणदीवाडी येथील रहिवासी सुधाकर महादेव नाईक (वय 52) यांचे सोमवारी (ता. २१) पहाटे निधन झाले. दीड-दोन महिने एकसंबे कुटुंबीयांनी रस्त्यावर काटेरी झुडपे टाकून रस्ता बंद केला आहे. एकसंबे यांच्या घरामागील काही अंतरावर सर्व्हे नंबर 81 मध्ये स्मशानभूमी आहे. एकसंबे यांच्या सर्व्हे नंबर 82 मधून रस्ता आहे. हा रस्ता त्यांनी बंद केला आहे. मुख्य मार्गावर वाहतूक समस्या निर्माण करून प्रवाशांना त्रास देऊ नये, असे सांगून रस्ता वाहतुकीस खुला केला. काही वेळानंतर चिक्कोडी, सदलगा येथून जादा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. दोन्ही बाजूंना समजविण्याचा प्रयत्न केला. पण यावर पोलिसांनी रस्त्यावरची काटेरी झुडपे काढून मृतदेह नेण्यास सांगितले.

रस्ता समस्येचे निवारण तात्पुरते केले आहे. सदर रस्त्याचा वाद न्यायालयात दाखल असून न्यायालयाच्या सुनावणीनंतर रस्ता समस्येवर तोडगा निघणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले. चिक्कोडी, अंकली, सदलगा महिला पोलिस दाखल झाल्या होत्या.

यावेळी 25 हून अधिक पोलिस तैनात केले होते. यावेळी तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, भरतगौडा एस. यांच्यासह ग्राम पंचायत पदाधिकारी महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

एकसंबा-चिक्कोडी मार्गावरून दीड तास वाहतूक बंद

एकसंबा-चिक्कोडी मुख्य मार्ग असल्याने या ठिकाणी हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र सकाळी दहाच्या सुमारास नणदीवाडी येथे मुख्य मार्गावर नागरिकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केल्यामुळे दीड तास वाहतूक कोंडी झाली. प्रवासी, विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. काही प्रवासी परत जाऊन अन्य मार्गाने जात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com