
Vantara & Jinsen Math Nandani : महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी शासन, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त पुनर्विचार याचिका सोमवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. शासन, वनतारा आणि मठ यांच्यात एकमत झाले असले, तरी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि निकालाकडे ‘महादेवी प्रेमीं’चे लक्ष लागून राहिले आहे.