
सणासुदीत तेल, तूप खरेदी करताय? क्वालिटी तपासा
esakal
Festive Season Food Inspection : सणासुदीमध्ये फराळासह विविध पदार्थ तयार करण्यासाठी तूप, खाद्य तेल, दुग्धजन्य पदार्थ, खवा, गूळ, ड्रायफुट्स, चॉकलेट्स आदींची मागणी वाढत असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये शहरासह जिल्ह्यात सहा ठिकाणी पावणेपाच लाखांचे संशयास्पद तेल, तूप आढळले. हा साठा तत्काळ जप्त करून याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.