
Owaisi Rally Ichalkaranji
esakal
असुदुद्दीन ओवेसींचा कोल्हापूर दौरा
सोमवार, २९ तारखेला खासदार ओवेसी कोल्हापूरला येणार. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडींचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्जतेचा कानमंत्र देणार.
कार्यक्रमांचे वेळापत्रक
दुपारी १२.३० वाजता उजळाईवाडी विमानतळावर आगमन. दुपारी १.३० वाजता बागल चौकातील जिल्ह्यातील पहिल्या अधिकृत पक्ष कार्यालयाचे उद्घाटन.
दुपारी ४ वाजता पत्रकारांशी संवाद.
सायंकाळी ७ वाजता इचलकरंजी, जवाहरनगर येथील यशोलक्ष्मी मैदानावर सभा. इतर मान्यवरांची उपस्थिती माजी खासदार इम्तियाज जलील, वारिस पठाण यांच्यासह अनेक मान्यवर या सभेला हजेरी लावणार.
Owaisi Speech Ichalkaranji : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवेसी सोमवारी (ता. २९) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर ते कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा करणार आहेत. सकाळी शहर व जिल्हा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, तर सायंकाळी इचलकरंजीत सभा होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर व इचलकरंजी लोकसभा जिल्हा समन्वयक इलियास कुन्नरे, इम्रान सनदी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.