Seven Cars Burnt In Midnight Blaze At Ajara
Esakal
कोल्हापूर
Kolhapur : आजऱ्यात मध्यरात्री अग्नितांडव, ७ चारचाकी गाड्यांसह दुकानं जळून खाक; कोट्यवधींचे नुकसान
Ajara Fire News : कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यात भीषण अग्नितांडव झालं आहे. मध्यरात्री शहरातील भरवरस्तीत असलेल्या दुकानगाळ्यांना आग लागली. या आगीत ७ चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
रणजित कालेकर, आजरा : आजऱ्यात शहरातील मध्यवस्तीत भीषण अग्नितांडव झालं. मध्यरात्री भडकलेल्या आगीत अनेक दुकानं आणि ७ चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. भाई भाई थिएटरसमोर असलेल्या दुकान गाळ्यांमध्ये आग भडकली. या आगीत सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. मात्र कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

