Kolhapur News : उत्पादन खर्च वाढला, दर अपुरे; अखेर शेतकऱ्यांच्या आवाजाला आजरा कारखान्याची सकारात्मक दाद
Ajara Sugar Factory Approves : आजरा साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी मूळत: ३४०० रुपये दर जाहीर केला होता; परंतु, आसपासच्या कारखान्यांनी ३५००–३६०० रुपयांपर्यंत दिलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत होता.
आजरा : वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना १०० रुपये वाढीव दर देणार आहे. हंगामाच्या यशस्वितेनंतर कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीला प्रत्येकी ५० रुपयांप्रमाणे दोन टप्प्यांत ही रक्कम आदा केली जाईल.