Hasan Mushrif : 'राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजित पवार एकटेच चर्चा करायचे', भाजपच्या विश्वासाने विलीनीकरण होणार; हसन मुश्रीफांची माहिती

Maharashtra political news : अजित पवारांच्या राजकीय निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. भाजपची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
Hasan Mushrif on NCP merger after Ajit Pawar exit

Hasan Mushrif on NCP merger after Ajit Pawar exit

esakal

Updated on

BJP strategy in Maharashtra politics : ‘विलीनीकरणाबाबत दिवंगत अजित पवार एकटेच चर्चा करीत होते. आमच्यापैकी कोणीही नेते त्याठिकाणी नव्हते. विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही, असा आमचा दावा नाही. पण, अजित पवार गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावे लागेल. त्यांचे मत काय आहे हेदेखील पाहावे लागेल,’ असे स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

‘रोहित पवारांनी आमच्या पक्षांतर्गत बाबींमध्ये कृपया भाग घेऊ नये. अजित पवारांचा पुतण्या म्हणून आम्ही त्यांची अस्वस्थतता समजू शकतो,’ असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com