Kolhapur Tourism : अंबाबाई मंदिरासह कोल्हापुरातील पर्यटनाचा होणार विकास; उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलं 'हे' आश्वासन

अधिक पर्यटक (Kolhapur Tourism) जाणाऱ्या यात्रास्थळांच्या विकासाला कोल्हापूरने प्राधान्य द्यावे.
Kolhapur Tourism Ajit Pawar
Kolhapur Tourism Ajit Pawaresakal
Summary

अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) परिसर विकास आराखड्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी घेतली.

कोल्हापूर : अधिक पर्यटक (Kolhapur Tourism) जाणाऱ्या यात्रास्थळांच्या विकासाला कोल्हापूरने प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. दरम्यान, अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) परिसर विकास आराखड्याची माहिती त्यांनी घेतली. या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे (Pune) येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषत: शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल विकास, कृषी, मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

Kolhapur Tourism Ajit Pawar
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला मोठा दिलासा! कोल्हापूर, सांगली पूरव्यवस्थापनास 'जागतिक बँके'ची मंजुरी; काय आहे प्रकल्प?

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपसचिव नितीन खेडकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे, आदी उपस्थित होते. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या आराखड्यांचे सादरीकरण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com