Kolhapur Moneylending Crisis : सावकारीच्या कथित जाचातून दोन जणांचा मृत्यू; कोल्हापूर जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाईची मागणी

Farmer Allegedly Pressured Despite Repaying Lakhs in Interest : लाखोंची परतफेड करूनही सुरू असलेला तगादा, मालमत्ता बळकावल्याचे आरोप आणि वाढत्या आर्थिक ताणामुळे अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Kolhapur Moneylending Crisis

Kolhapur Moneylending Crisis

esakal

Updated on: 

कोल्हापूर : आठ ते नऊ वर्षांपूर्वी उसने घेतलेल्या ९ लाखांपोटी सावकाराने २६ लाख रुपये उकळले. शेती नावावर करून घेतल्याने उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला. आणखी २५ लाखांसाठी तगादा सुरू झाल्याने पाच वर्षांच्या मुलाच्या भविष्याचा विचार न करता वडिलांनी स्वतःचे आयुष्य संपवले. दुसऱ्या घटनेत कोरोचीत आठवड्याला १० हजारांचे व्याज देऊन थकलेल्या बांधकाम कंत्राटदारानेही गळफास घेतला. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत व्यवसायासाठी सावकारांकडून हातउसने पैसे घेतलेले छोटे उद्योजक गोत्यात येऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेकायदेशीर खासगी सावकारांविरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ची आवश्यकता आहे.

जिल्ह्यातील केवळ ३२४ सावकारांची दप्तरी नोंद आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दरवर्षी या सावकारांची तपासणी केली जाते. मागील वर्षभरात ७५ ठिकाणी छापे टाकून पंचवीसभर सावकारांवर कारवाईही केली; पण बेकायदेशीर सावकारीचे काय? अशा प्रश्न उभा आहे. जिल्ह्यात काही दिवसांत खासगी सावकारांची दहशत पुन्हा दिसत आहे. शेतकऱ्यांपासून व्यावसायिक, नोकरदारांपासून वेश्या व्यवसायातील महिलाही सावकारांच्या या फासात अडकल्या आहेत.

Kolhapur Moneylending Crisis
MPSC विद्यार्थ्यांचा संताप कायम; पुण्यात रात्रीपासून आंदोलन, नेमकी मागणी काय? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विद्यार्थी रस्त्यावर

पाच वर्षांचा मुलगा पोरका....

कागलच्या सोनगेतील श्रीधर डावरे यांनी नऊ वर्षांपूर्वी ९ लाख रुपये खासगी सावकाराकडून घेतले होते. याबदल्यात सावकाराने डावरे यांची शेतजमीन नावावर करून घेतली. पन्नास लाखांच्या वसुलीचा खासगी सावकार निवास पाटील याचा इरादा होता; पण डावरे यांनी स्वतःलाच संपवून टाकले. त्यांच्या १७ वर्षीय मुलीने यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सध्या त्यांचा पाच वर्षांचा मुलगा, पत्नी आणि आई घरचा कर्ता पुरुष गमावल्याने अश्रू ढाळत आहेत.

"राज्यभरात सावकारांविरोधातील तक्रारी वाढल्याने राज्य मंत्रिमंडळानेही अवैध सावकारांविरोधातील कायदे कडक करण्याच्या सूचना केल्या आहेत. खासगी सावकारांकडून त्रास होत असेल, त्यांनी मालमत्ता बळकावल्या असतील तर तुम्ही दिलेले व्याज, पोलिसांत केलेल्या नोंद तक्रारीची प्रत घेऊन उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केल्यास या मालमत्ता सावकारांच्या ताब्यातून सोडवून संबंधितांवर कारवाईही केली जाईल."

- नीळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक

Kolhapur Moneylending Crisis
Pusad Farmer Tragedy : पिकांचे नुकसान पाहताना हृदयविकाराने मृत्यू दुष्काळाच्या धास्तीने अल्पभूधारक शेतकऱ्याचा बळी; पांढुर्णा खुर्द येथील घटना

इचलकरंजीत सावकारीला ऊत

कोरोचीतील इसराईल गायकवाड (वय ३८, रा. कोरोची) या बांधकाम कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. २८ सप्टेंबरला झालेल्या आत्महत्येत खासगी सावकार बबन तुकाराम आवळे याच्याकडून तीन वर्षांपूर्वी २ लाख रुपये घेतले होते. व्याजापोटी आठवड्याला १० हजार देण्याच्या दबावाखाली गायकवाड यांनी गळफास घेत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यांपूर्वीही एकाने खासगी सावकाराच्या तगाद्याने आत्महत्या केली होती, तर वेश्या व्यवसायातील महिलांकडेही काही सावकारांचा तगादा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Punyashlok Ahilyadevi loan waiver
Wardha Kharif Crop Loan
Manoj Jarange demand for blanket farmer loan waiver
Maharashtra Farmer Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com