

Girls From Akkalkot Fall Ill Due to Food Poisoning During Picnic
esakal
Kolhapur latest local news : अक्कलकोट (जि. सोलापूर) येथून शालेय सहलीसाठी येथे आलेल्या मुलींना अन्नातून विषबाधा झाली. नववीत शिकणाऱ्या सहा ते सात मुलींना अधिक त्रास होऊ लागल्याने तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. चार दिवसांपासून मुली कोल्हापूर दर्शन सहलीवर आल्या आहेत. आज दुपारनंतर जुलाब, उलट्यांचा त्रास होत असल्याने रुग्णालयात आणण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.