
गोकुळ दूध संघाच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक आणि नविद मुश्रीफ यांच्यातील राजकीय समीकरणावर लक्ष केंद्रीत.
esakal
Gokul Milk Politics : ‘डिबेंचरसाठी चाळीस टक्के रक्कम कपात करणार म्हणून तालुका पातळीवर झालेल्या संपर्क सभेत का सांगितले नाही? वार्षिक सर्वसाधारण सभेतही यावर चर्चा केली नाही. कोणत्याही दूध उत्पादकाला आणि दूध संस्थांनाही विश्वासात घेतलेले नाही. आतापर्यंत कधीही कपात केली नाहीएवढी चाळीस टक्के रक्कम कपात करून उत्पादक आणि संस्थांवर अन्याय केला आहे. त्यामुळे डिबेंचरची रक्कम तत्काळ परत मिळाली पाहिजे’, अशी ठाम भूमिका घेत ‘गोकुळ’ संचालिका शौमिका महाडिक यांनी संचालकांना धारेवर धरले.