Dhairyasheel Mane : आलमट्टीप्रश्‍नी केंद्र करणार हस्तक्षेप : धैर्यशील माने : केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही

दोन्ही राज्यांमध्ये वैज्ञानिक समन्वयासाठी संयुक्त पूर नियंत्रण प्राधिकरण स्थापन करून कृष्णा नदीच्या खोऱ्यात रिअल-टाईम मॉनिटरिंग सिस्टीम आणि पूर्वसूचना प्रणाली स्थापित करावी. या धरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा आणि सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीररीत्या जबाबदार धरावे.
Dhairyasheel Mane briefs the media after meeting Central Water Minister regarding Almatti issue.
Dhairyasheel Mane briefs the media after meeting Central Water Minister regarding Almatti issue.Sakal
Updated on

नवी दिल्‍ली / कोल्हापूर : कर्नाटक सरकारकडून आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट पुन्हा वाढणार आहे, याकडे खासदार धैर्यशील माने यांनी लक्ष वेधले. याची गांभीर्याने दखल घेत आलमट्टीप्रश्‍नी केंद्र सरकार हस्तक्षेप करेल, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज येथे दिली. तसेच याप्रश्‍नी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या जलसंपदामंत्र्यांची बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितल्‍याची माहिती माने यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com