
Maharashtra Karnataka Politics : कर्नाटकातील भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा कर्नाटकचा वैध हक्क असल्याचे स्पष्ट केले. कृष्णा जलवाटप न्यायाधीकरण-२ च्या आदेशानुसार ही उंची वाढ अनुमोदित आहे, त्यामुळे महाराष्ट्राने यावर आक्षेप घेणे अनुचित असल्याचे मत मांडले आहे.