
Kolhapur Ambabai
esakal
भरपावसातही विक्रमी गर्दी
दुपारनंतर झालेल्या पावसातही भाविकांचा उत्साह कायम राहिला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत २,२३,१०६ भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले – नवरात्रातील ही उच्चांकी गर्दी.
भाविकांना सोयीसुविधा
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी गटागटाने महिलांना देवदर्शनाची सोय केल्याने रांगा वाढल्या. सरलष्कर भवन परिसर दर्शनरांगेने दिवसभर गजबजलेला होता.
पावसातही सुरक्षित दर्शन
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शेड्स, सुरक्षा व स्वयंसेवकांमुळे भाविकांची गैरसोय टाळली. गरुडमंडपासमोरील रांगा पावसापासून सुरक्षित; मात्र दत्तमंदिरकडील रांगेवर शेड नसल्याने छत्र्या घेऊन दर्शन.
Kolhapur Navratri Ambabai Mandir : दुपारनंतर आलेल्या पावसातही भाविकांनी उत्साहाने श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केली. सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन लाख २३ हजार १०६ भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवातील ही उच्चांकी गर्दी आहे.