
Ambabai Temple News : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली संवर्धन प्रक्रिया आज पूर्ण झाली. त्यामुळे गुरुवारी (ता. १४) दुपारी बारापासून मुख्य मूर्तीचे दर्शन पूर्ववत केले जाणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
यासाठी श्रीपूजकांमार्फत गुरुवारी सकाळी देवीचा प्राणतत्त्व पुनर्प्रतिष्ठापित विधी करण्यात येणार आहे. सर्व धार्मिक विधी सकाळच्या सत्रात पूर्ण झाल्यावर दर्शन सुरू होईल. दरम्यान, आज (ता. १३) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार मंदिराच्या गर्भगृहाच्या स्वच्छतेसह अन्य कामांची पूर्तता करण्यात येणार आहे.