Fact Chek Ambabai Temple : श्री अंबाबाईचे दर्शन केवळ एक तास दहा मिनिटांत, योग्य नियोजनामुळे भक्तांचे गैरसोय टळली

Ambabai Temple Darshan : नवरात्रोत्सवाला प्रारंभ होऊन चार दिवस उलटले तरीही सरलष्कर भवन येथील दर्शनरांग भाविकांनी भरली नाही. शेतकरी संघात तर दर्शनरांग पोहोचलीच नाही.
Fact Chek Ambabai Temple

Fact Chek Ambabai Temple

esakal

Updated on
Summary
  1. वेगवान दर्शन अनुभव – नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना फक्त १ तास १० मिनिटांत देवीचे दर्शन घडत आहे.

  2. नवीन नियोजन व सुविधा – कासव चौकातून नवीन दर्शनरांगेची सोय, मंदिराच्या आत रॅम्प व अडथळे कमी केल्याने भाविकांना जास्त वेळ थांबावे लागत नाही.

  3. भाविकांची गर्दी असूनही रांगा रिकाम्या – भाविकांची संख्या मोठी असली तरी योग्य नियोजनामुळे रांग भरत नाही व महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा असल्याने व्यवस्थापन सुलभ झाले आहे.

Kolhapur Ambabai Temple Darshan : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवरात्रोत्सवातील दर्शनरांगेचे योग्य नियोजन केल्यामुळे केवळ एक तास दहा मिनिटांत आज देवीचे दर्शन झाले. नवरात्रोत्सवाला प्रारंभ होऊन चार दिवस उलटले तरीही सरलष्कर भवन येथील दर्शनरांग भाविकांनी भरली नाही. शेतकरी संघात तर दर्शनरांग पोहोचलीच नाही. भाविकांच्या संख्या तर जास्त आहे; मात्र दर्शनरांग का भरत नाही?, याचे आज फॅक्ट चेक केले असता कासव चौकातून केलेली दर्शनरांगेची सुविधा, मंदिराच्या अंतर्गत भागात केलेली रॅम्पची व्यवस्था यामुळे दर्शनरांगेत भाविकांना अधिक काळ थांबावे लागत नसल्याचे स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com