
Ambabai Temple Lighting
esakal
अंबाबाई मंदिरात पूर्वी ८४ कंदील, दोन कंदीलांचा गाभारा व तीन मशालींच्या उजेडात पालखी सोहळा होत असे; रोषणाई व चुना लावण्याची जबाबदारी चंद्र सखाराम सावंत या रोषणाईकाराकडे होती.
उदयसिंह राजेयादव यांनी ‘करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी कागदपत्रे’ या खंड-२ मधून १७००–१८९६ दरम्यानच्या अंबाबाई मंदिरातील व्यवस्थेची माहिती मोडी लिपीतून उलगडली.
१९७० च्या दशकापासून विजेची व्यवस्था झाली असून आज हायमास्ट, एलईडी बल्ब, रंगीत एलईडी यामुळे मंदिर उजळते; मात्र पालखी सोहळ्यात मशालींचा वापर अजूनही कायम आहे.
Ambabai Mandir Kolhapur : नंदिनी नरेवाडी :अंबाबाई मंदिर कंदिलाच्या दिव्यांनी उजळून निघायचे. त्यासाठी ८४ कंदिलांचा प्रकाश मंदिर परिसरात पडत होता. गाभाऱ्यातही दोन कंदिलांच्या उजेडात मूर्तीचे दर्शन होत होते. या कंदिलांत तेल घालण्याची जबाबदारी चंद्र सखाराम सावंत या रोषणाईकारावर होती. त्याच्याकडे नवरात्रोत्सवात मंदिराला रंगविण्यासाठी चुना लावण्याची जबाबदारीही होती. अंबाबाई मंदिरात कशा पद्धतीची व्यवस्था होती आणि प्रधान कशा पद्धतीने या सर्वांवर देखरेख ठेवत होते, याची माहिती मोडी लिपीच्या अभ्यासातून पुढे आली.