
Ambabai Tramboli Devi Meet
esakal
नवरात्राच्या पाचव्या दिवशी देवीपूजा व भाविकांची गर्दी
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या ‘श्रीभुवनेश्वरी माता’ रूपातील पूजा बांधण्यात आली. कोल्हापूरसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा व इतर जिल्ह्यांतील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली; रात्रीच्या पालखी सोहळ्यालाही महापूरासारखी गर्दी.
त्र्यंबोली भेट व कोहळा पंचमी सोहळा
२७ तारखेला तुळजाभवानी देवी लवाजम्यासह अंबाबाई देवी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाणार; कोहळा फोडण्याच्या विधीसह पारंपरिक सोहळा होणार.
अन्नछत्र व तुळजाभवानीची पूजा
श्री महालक्ष्मी अन्नछत्रास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत ३५ हजार भाविकांनी प्रसाद घेतला, पुढील दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता.
Ambabai Mahavidya Pooja : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या श्रीभुवनेश्वरी माता रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी दिवसभर उच्चांकी गर्दी झाली. रात्रीही पालखी सोहळ्याला भाविकांचा महापूर लोटला होता. दरम्यान, शनिवारी (ता. २७) करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी देवी लवाजम्यासह त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाणार आहे. कोहळा फोडण्याच्या विधीसह भेटीचा सोहळा सजणार आहे.