
Kolhapur Nandani Math : कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या ‘महादेवी हत्तीण' बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अवघ्या तासाभरात हत्तीणीला नेण्यासाठी वनतारामधील टीम दाखल झाली. सांगली जिल्ह्याच्या सीमेवर एका हॉटेलमध्ये गुजरात पासिंगची Animal Ambulance सह टीम थांबली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर Animal Ambulance सह वाहने कोल्हापूर दिशेने नांदणीकडे रवाना झाली.