
Kolhapur Crime
esakal
धाडसी बालिका स्वरा देसाई – नांदणीतील आठ वर्षांच्या स्वराने अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला; अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेऊन व आरडाओरडा करून स्वतःची सुटका केली.
घटना व पोलिसांची कारवाई – १९ तारखेला रात्री डेअरीकडे जाताना अंधाराचा फायदा घेऊन तीन-चार जणांनी अपहरणाचा प्रयत्न केला. शिरोळ पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले; मात्र कॅमेरे बंद असल्याने सुराग लागला नाही.
गावकऱ्यांचा संताप व कौतुक – या घटनेने गावात भीतीचे वातावरण असून, आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे; दुसरीत शिकणाऱ्या स्वराचा शाळेत सत्कार करण्यात आला.
Jaysingpur Nandani Crime : आठवर्षीय बालिकेने स्वतःच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला. तिने अपहरण करू पाहणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या हाताचा करकचून चावा घेतला आणि स्वतःची सुटका करून घेतली. या धाडसी मुलीचे नाव आहे स्वरा शीतल देसाई. ती नांदणी येथील आहे. हा सारा प्रकार शुक्रवारी (ता. १९) रात्री घडला. घटना समजातच शिरोळ पोलिसांनी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले; मात्र पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नाहीत. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण आहे.