
Woman Suspicious Death
esakal
संशयास्पद मृत्यू – कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथील ६५ वर्षीय मनोरमा विजय सातार्डेकर यांचा मृतदेह त्यांच्या शेतात संशयास्पद स्थितीत आढळला.
वन्यप्राण्याचा हल्ला? – नातेवाईक व ग्रामस्थांनी वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा संशय व्यक्त केला; मात्र घटनास्थळी ठसे किंवा कपडे फाटल्याचे पुरावे न मिळाल्याने वन विभागाने हा दावा फेटाळला.
तपासाची दिशा – फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने मृत्यूचे खरे कारण शोधण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे; वन विभागाने घटनास्थळी दोन ट्रॅप कॅमेरे बसवले.
ग्रामस्थांत संभ्रम – सोन्याचे दागिने व हातातील पिशवी तशीच असल्याने चोरीचा हेतूही दिसत नाही; त्यामुळे मृत्यूमागील नेमका हेतू व कारण अस्पष्ट.
Forensic Investigation Chandgad : कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथील वृद्धेचा मृतदेह शेतामध्ये संशयास्पद स्थितीत सापडला. मनोरमा विजय सातार्डेकर (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. नातेवाईक व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एखाद्या वन्यप्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा. मात्र, वन विभागाने हा दावा फेटाळून लावला आहे. पोलिसांनी या संदर्भात फॉरेन्सिक लॅबची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाची दिशा निश्चित होणार आहे.